← 输入框|mr.wikipedia.org|刷新
Jump to content

मुखपृष्ठ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मराठी विकिपीडियावर तुमचे स्वागत असो.
कोणीही घडवू शकेल असा हा मुक्त ज्ञानकोश आहे.
सध्या यात १,०३,७२७ लेख आहेत.
आपणांसी जे जे ठावे, ते इतरांसी सांगावे; शहाणे करोनी सोडावे, सकलजन.
वाचा

सर्व पाने मुखपृष्ठ सदरे
उदयोन्मुख सदरे
विकिप्रकल्प मोबाईल ?

लिहा
कसे लिहू

काय लिहू
इतर काय लिहीताहेत

घडवा

चावडीवर चर्चा करा
पुढचे मुखपृष्ठ सदर निवडा
विविध प्रस्तावांवर कौल द्या

विशेष लेखन क्रीडा वैद्यकशास्त्र वनस्पती इतिहास भूगोल सूर्यमाला महाराष्ट्र शासन दालन सूची विकिपीडिया सांख्यिकी

विशेष लेख

जेम्स आल्बर्ट मिशनर (फेब्रुवारी ३, इ.स. १९०७:डॉइल्सटाउन, पेनसिल्व्हेनिया, अमेरिका - ऑक्टोबर १६, इ.स. १९९७:ऑस्टिन, टेक्सास, अमेरिका) हे पुलित्झर पुरस्कार विजेते अमेरिकन लेखक होते.

मिशनरने ४०पेक्षा अधिक पुस्तके लिहिली आहेत. यांतील बहुतेक पुस्तकांची कथानके दीर्घ काळात पसरलेली आणि अनेक कुटुंबांतील अनेक पिढ्यांचा माग घेणारी आहेत. ही कथानके विशिष्ट प्रदेशांत असून त्यांत तेथील इतिहासाचा बारीक तपशील विणलेला आहे. ही पुस्तके लिहिण्यासाठी मिशनरने प्रत्येक प्रदेशांत अनेक वर्षे घालवून संशोधन केले होते.

मिशनरचा जन्म ३ फेब्रुवारी, १९०७ रोजी अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया राज्यातील डॉइल्सटाउन शहरात झाला. नंतर त्यांनी लिहिलेले आहे की आपले खरे आई-वडील कोण होते आणि आपला जन्म नेमका कुठे झाला हे त्यांना माहिती नव्हते. त्यांना त्यांच्या दत्तक आई मेबेल मिशनरने वाढवले. त्या क्वेकर होत्या आणि जेम्सनाही त्यांनी क्वेकर धर्मात वाढवले.

मिशनरने १९२५मध्ये डॉइल्सटाउनच्या सेंट्रल बक्स हाय स्कूलमधून बारावी उत्तीर्ण केल्यानंतर १९२९मध्ये स्वार्थमोर कॉलेजमधून इंग्लिश आणि इतिहास विषयांमध्ये पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी देशभर प्रवास केला. खिशात पैसे नसल्याने ते महामार्गावर लोकांकडून फुकट लिफ्ट मागत तसेच मालगाड्यांच्या डब्यातून प्रवास करीत असत. त्यानंतर ते स्कॉटलंडला युनिव्हर्सिटी ऑफ सेंट अँड्रुझ येथे गेले व तेथे दोन वर्षांची पदवी मिळवली.

स्कॉटलंडहून परतल्यावर त्यांनी पॉट्सटाउनमधील द हिल स्कूल येथे शिक्षकाची नोकरी पत्करली. १९३३ ते १९३६ दरम्यान त्यांनी न्यूटाउन शहरातील जॉर्ज स्कूल येथे इंग्लिश शिकवले. त्यानंतर ते कॉलोराडोच्या ग्रीली शहराला गेले व तेथील कॉलोराडो स्टेट टीचर्स कॉलेजमधून (आताचे युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्दर्न कॉलोराडो) शिक्षणशास्त्रात उच्चपदवी घेतली.

युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्दर्न कॉलोराडोमधून पदवी घेतल्यावर मिशनरने तेथे आणि कॉलेज हाय स्कूल मध्ये शिकवले. ऑक्टोबर १९७२मध्ये विद्यापीठाने त्यांच्या नावाने एक ग्रंथालय स्थापले आहे.

१९३९मध्ये मिशनरने हार्वर्ड विद्यापीठात पाहुणे व्याख्याता म्हणून पद स्वीकारले व ते कॉलोराडो सोडून परत ईशान्य अमेरिकेत गेले. तेथे एक वर्ष काम केल्यानंतर त्यांनी मॅकमिलन पब्लिशर्स या प्रकाशन कंपनीमध्ये समाजशास्त्रीय शिक्षण संपादक पदावर नोकरी घेतली.

याच सुमारास दुसरे महायुद्ध सुरू होते व जपानने पर्ल हार्बरवर हल्ला केल्यानंतर त्यात अमेरिका ओढले गेले होते व अमेरिकेतील १८-४५ वर्षाच्या सगळ्या नागरिकांना लष्करात भरती केले जात होते. आपण क्वेकर धर्म पाळतो, लढाई करणे हे आपल्या धर्माविरुद्ध असल्याने आपण नैतिक युद्धविरोधी असल्याचे कारण सांगून मिशनरना लष्करात भरती होणे नाकारता आले असते परंतु मिशनरनी अमेरिकेच्या आरमारात भरती होणे पसंत केले. युद्धादरम्यान त्यांची जेथे बदली झाली तेथील अधिकाऱ्यांचा असा चुकीचा समज झाला की अ‍ॅडमिरल मार्क मिट्शर हे जेम्स मिशनरचे वडील आहेत. त्यामुळे त्यांना अनेक ठिकाणी पाठविण्यात आले. या प्रवासांमधील अनुभवांवरून त्यांनी टेल्स ऑफ द साउथ पॅसिफिक हे आपले पहिले पुस्तक लिहिले.

पुढे वाचा... जेम्स मिशनर

मागील अंक: जून २०२६ - मार्च २०२६ - ऑगस्ट २०२५ - जानेवारी २०२५ - नोव्हेंबर २०२४ - नोव्हेंबर २०२३ - एप्रिल २०२३ - ऑगस्ट २०१९ - जून २०१९ - एप्रिल २०१९ - मार्च २०१९ - जानेवारी २०१९ - नोव्हेंबर २०१८ - मे २०१८ - मार्च २०१८ - महिला दिवस, २०१८ - २०१७ मधील सदर लेख - २०१६ मधील सदर लेख - २०१५ मधील सदर लेख - २०१४ मधील सदर लेख- २०१२ मधील सदर लेख - २०१२ मधील सदर लेख - २०११ मधील सदर लेख - २०१० मधील सदर लेख - २००९ मधील सदर लेख - २००८ मधील सदर लेख - मागील अंक

मोबाईल ?

मागील अंक पाहा ·आगामी सदर निवडा

आजचे छायाचित्र

थोडक्यात 'विकिपीडिया' प्रकल्पाविषयी

पृष्ठे ·सहाय्य ·सांख्यिकी ·वर्ग

आपण नवीन सदस्य आहात?

दिनविशेष


अलीकडील मृत्यू :  •  एम.पी. परमेश्वरन (११ ऑगस्ट, २०२६),  •  चू रोंग्जी (१२ ऑगस्ट, २०२६),  •  सज्जन कुमार (२० ऑगस्ट, २०२६),  •  यास्मिन शेख (२४ ऑगस्ट, २०२६),  •  कुकू कोहली,  •  डॉली पार्टन (२५ ऑगस्ट, २०२६),  •  हरिश्चंद्र मिश्रा (३ सप्टेंबर, २०२६),  •  सूर्य कृष्णमूर्ती (२३ सप्टेंबर, २०२६),  •  मुश्ताक खान (२४ सप्टेंबर, २०२६),  •  नाना पाटेकर (८ ऑक्टोबर, २०२६),  •  मधु कांबीकर (१२ ऑक्टोबर, २०२६),  •  चेरुवयल रामन (१४ ऑक्टोबर, २०२६)

उदयोन्मुख लेख

फ्रान्सच्या रशियावरील आक्रमणास २४ जून १८१२ रोजी फ्रेंच सम्राट नेपोलियनच्या ग्रान्द आर्मीने रशियन सैन्यावर आक्रमण करण्यासाठी नेमान नदी ओलांडल्यावर प्रारंभ झाला. यातून रशियन सम्राट अलेक्झांडरने आपल्या हस्तकांमार्फत ब्रिटनशी व्यापार करणे थांबवावे, जेणेकरून ब्रिटनला शांततेसाठी तह करणे भाग पडेल अशी नेपोलियनची मनीषा होती. या मोहिमेचे अधिकृत धोरण पोलंडला रशियाच्या धोक्यापासून वाचवणे हे होते. नेपोलियनने पोलंडच्या जनतेकडून पाठिंबा मिळवण्यासाठी या मोहिमेचे 'दुसरे पोलिश युद्ध' असे नामकरण केले. आता मात्र हे युद्ध फ्रान्समध्ये रशियावरील मोहीम (फ्रेंच: Campagne de Russie) व रशियामध्ये १८१२ चेराष्ट्रभक्तिपर युद्ध (रशियन: Отечественная война 1812 года, Otechestvennaya Voyna 1812 Goda) या नावांनी ओळखले जाते.

ग्रान्द आर्मी ही ६,८०,००० सैनिकांची महाकाय फौज होती व त्यात ३,००,००० सैन्य फ्रेंच प्रांतांमधून आलेले होते. सैन्याची मोठी आगेकूच करून नेपोलियनने रशियन सैन्यास सामोरे जाण्यासाठी पश्चिम रशिया पादाक्रांत केला व स्मोलेन्स्क येथील लढाईत तसेच अन्य काही किरकोळ चकमकींत विजय मिळवले. स्मोलेन्स्कनंतर ही मोहीम संपेल अशी नेपोलियनला आशा होती परंतु रशियन सैन्याने शहरास आग लावून पूर्वेकडे पळ काढला. त्यामुळे स्मोलेन्स्क ताब्यात घेण्याचे नेपोलियनचे इरादे संपुष्टात आले व त्याला रशियनांचा ससैन्य पाठलाग करणे भाग पडले.

रशियन सैन्य माघार घेत असताना कॉसॅक लोकांवर गावे, शहरे व शेती जाळून नष्ट करण्याचे कार्य देण्यात आले जेणेकरून आक्रमकांना ताब्यात घेतलेल्या प्रदेशातून अन्नधान्य मिळू नये. या दग्धभू रणनीतीमुळे फ्रेंचांना मोठा धक्का बसला. आपल्याच प्रदेशाचा नाश करून आपल्याच लोकांना त्रास देण्याची रशियनांची मानसिकता त्यांना समजणे कठीण गेले. या कृतींमुळे फ्रेंचांना अन्नपुरवठा प्रणालीवर विसंबून रहावे लागले जी त्यांच्या फार मोठ्या सैन्यास अपुरी पडणारी होती. उपासमार व हलाखीच्या परिस्थितीम्ळे फ्रेंच सैनिक रात्री अन्नाच्या शोधात बाहेर पडू लागले. अशा सैनिकांना बऱ्याचदा जे त्यांना कैद किंवा ठार करत असत, अशा कॉसॅक टोळ्यांना सामोरे जावे लागे.

रशियन सैन्याने सलग तीन महिने रशियाच्या अंतर्भागात माघार घेतली. या सातत्यपूर्ण माघारीमुळे तसेच आपल्या जमिनी गेल्यामुळे रशियाचा उमराव वर्ग नाराज झाला. त्यांनी सम्राट अलेक्सांद्रला रशियन सैन्याचा सर्वोच्च सेनानी फील्ड मार्शल बार्क्ले याला हटवण्यास भाग पाडले तेव्हा सम्राटाने राजपुत्र मिखाईल कुटुझोव या अनुभवी सेनाधिकाऱ्यास नियुक्त केले. परंतु आपल्या पूर्वाधिकाऱ्याप्रमाणे कुटुझोवनेही आणखी दोन आठवडे माघार घेणे कायम ठेवले.

(पुढे वाचा...)

मागील अंक पाहा ·आगामी सदर निवडा

आणि हे आपणास माहीत आहे का?

सबॉबा
सबॉबा
सबॉबा
सबॉबा


वरील माहिती मराठी विकिपीडियावर अलीकडे संपादित केलेल्या लेखांतून गोळा केलेली आहे.

संक्षिप्त सूची

समाजशास्त्र

पुरातत्त्वशास्त्र • मानवशास्त्र • अर्थशास्त्र • शिक्षण • कायदा • समाजशास्त्र • राजकारण • राजनीती विज्ञान

  भूगोल

भूगोल • खंड • देश • शहरे • पर्वत • समुद्र • पृथ्वी • खगोलशास्त्र • सूर्यमाला

कला आणि संस्कृती

नृत्य • संगीत • व्यंगचित्र • काव्य • शिल्पकला • नाटक •

विश्वास

श्रद्धा • धर्म • हिंदू धर्म • इस्लाम धर्म • ख्रिश्चन धर्म • रोमन धर्म • बौद्ध धर्म • जैन धर्म • ज्यू धर्म • संस्कृतीनुसार दैवते •

• पराश्रद्धा • फलज्योतिष •

• अश्रद्धा • नास्तिकता

अभियांत्रिकी

तंत्रज्ञान • जैवतंत्रज्ञान • अतिसूक्ष्मतंत्रज्ञान • अभियांत्रिकी • रासायनिक अभियांत्रिकी • विमान अभियांत्रिकी • अंतरीक्ष अभियांत्रिकी • संगणक • संगणक अभियांत्रिकी • स्थापत्य अभियांत्रिकी • विद्युत अभियांत्रिकी • विजाणूशास्त्र • यांत्रिकी

विज्ञान आणि आरोग्य

विज्ञान • जीवशास्त्र • वनस्पतीशास्त्र • पशु विज्ञान • आयुर्विज्ञान • भौतिकशास्त्र • रसायनशास्त्र • जैवरसायनिकी • गणित • अंकगणित • बीजगणित • भूमिती • कलन • स्वास्थ्यविज्ञान • रोग • चिकित्साशास्त्र • चिकित्सा पद्धती

भाषा आणि साहित्य

भाषा • भाषा-परिवार • भाषाविज्ञान • मराठी भाषा • साहित्य • काव्य • कथा

मनोरंजन आणि क्रीडा

क्रीडा • क्रिकेट • फुटबॉल • चित्रकथा • दूरचित्रवाहिनी • पर्यटन • पाककला • इंटरनेट • रेडियो • चित्रपट • बॉलीवूड

व्यक्ती आणि वल्ली
व्यक्ती • अभिनेते • अभिनेत्री • खेळाडू • लेखक • शास्त्रज्ञ • संगीतकार • संशोधक • गायक

इतिहास

इतिहास • कालमापन • संस्कृती • देशानुसार इतिहास • युद्ध • महायुद्धे • साम्राज्ये

पर्यावरण
पर्यावरण • पर्यावरणशास्त्र • हवामान• पश्चिम घाट

निवेदन

मराठी विकिपीडियाची प्रगती सातत्याने होत आहे. ही गती वाढविण्यासाठी आणि विकिपीडियातील मजकूर अधिक गुणवत्तेचा तसेच परिपूर्ण करण्यासाठी आपला सहयोग अतिमहत्त्वाचा आहे. यासाठी पुढील काही गोष्टी आपण करु शकता:
  • "अलीकडील बदल" हे अतिशय लोकप्रिय पान आहे. यापानावरील इतरांकडून होत असलेले बदल तुम्ही तपासून पाहू शकता. एक वाचक म्हणून आपला प्रतिसाद संबधित लेखांच्या चर्चापानावर नोंदवा किंवा लेखाचे स्वतः संपादन करा.
  • येथे दिसत असलेले मुखपृष्ठ सदर अनेक विकिपीडियन्स तयार करतात. यासाठी प्रत्येक महिन्याकरता एक विषय निवडला जातो व त्या विषयावरील लेख मासिक सदर म्हणून प्रकाशित केला जातो. येत्या महिन्याच्या मासिक सदरासाठी येथे नामनिर्देशन करा.
  • विकिपीडिया प्रकल्प पानांवर उपलब्ध प्रकल्प पाहून आवडीच्या प्रकल्पात सहभाग नोंदवा किंवा नवीन प्रकल्पाची सुरुवात करा.


इतर भारत ध्वज भारतीय भाषांमधील विकिपीडीया

१०,००,०००+ : इंग्लिश

१,००,०००+ : हिंदी , उर्दू , तमिळ, बंगाली.
५०,०००+ : तेलुगू, मल्याळम.
१०,०००+ : नेपाळी, गुजराती, संस्कृत,
कन्नड, पंजाबी, उडिया, सिंधी.

१,०००+ : संथाली, मैथिली, काश्मिरी.
संपूर्ण यादी

विकिपीडियाचे सहप्रकल्प

विकिपीडिया स्वयंसेवक संपादकांनी लिहिलेले आहे आणि विकिमीडिया फाउंडेशन या विना-नफा तत्त्वावर चालणार्‍या संस्थेचा प्रकल्प असून या संस्थेद्वारे इतर अनेक विकिपीडियाचे सहप्रकल्प चालवले जातात: